December 4, 2024

खुलताबाद परिसरात दामिनी पथकांची कार्यवाही; १२ टवाळखोरांना पकडले

0
Contact News Publisher

खुलताबाद – महिला व मुलिंच्या सुरक्षेच्या दृष्टिको नातून स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने छेडखानी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे यात दामिनी पथकाने खुलताबाद तालुक्यात ठिकठिकाणी एकाच दिवशी बारा टवाळखोरांवर कारवाई केली असून या कार्यवाहीमुळे मुली व महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना आळा बसणार आहे,

अपघात नव्हे पूर्वनियोजित हत्या!, मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप; खुलताबाद-शुलिभंजन अपघात प्रकरणाला नवे वळण

सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे त्यात पावसाळा सुरू आहे खुलताबाद तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने म्हैसमाळ सुलिभंजन वेरूळ परीसरातील डोंगर भाग हिरवेगार झाले आहे त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांची व श्रावण महिन्यामुळे मंदिर परीसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळावर व मंदिर परीसरात
महिलांविरुद्ध व मुली विरूद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक, सुनिल लांजेवार,यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव, यांनी सोमवार रोजी खुलताबाद तालुक्यात एकाच दिवशी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात भद्रा मारुती मंदिर परिसरात तसेच म्हैसमाळ येथील पर्यटन स्थळावर १२ टवाळखोरांवर कारवाई केली आहे, दामिनी पथकाच्या कार्यवाहीने सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणारे व दारू पिऊन उनाडक्या करणारे तसेच महिला व मुलिंना पाहून असशील चाळे करणाऱ्या टवाळखोरांना मोठा वचक बसला आहे

Crime news : फिर्यादीच निघाला आरोपी साथीदारासह केला दरोडेचा बनाव; आरोपी जेरबंद

महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक सुरू करण्यात आले आहे . दामिनी पथकाने १ जुन ते ६ ॲागस्ट दरम्यान १८ छेडखानी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे  खुलताबाद तालुक्यातील व शहरातील संवेदनशील ठिकाणी दामिनी पथका गस्त घालून, भेटी देऊन महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना आळा बसेल या उद्देशाने जनजागृती कार्यक्रम घेतले आहे शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी प्रभावी पेट्रोलिंग करून एकूण प्रेमीयुगुलांवर व छेडखानी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जात आहे .

मुलींनो हे नंबर सेव्ह करा…

छेडछाडीसारखा अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तात्काळ मदती करिता दामिनी पथकाचा हेल्पलाईन क्रमांक 9529659983 किंवा 112 क्रमांकावर पोलीसांना संपर्क करावा, असे आवाहन दामिनी पथकातर्फे महिला व मुलींना तसेच नागरिकांना करण्यात आले आहे.
परिसरात टवाळखोर किंवा संशयीत ईसमांचा वावर दिसल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे अवाहन दामिनी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव, यांनी केले आहे, खुलताबाद तालुक्यात ठिकठिकाणी टवाळखोरांवर कार्यवाही दरम्यान
सह पोलीस अंमलदार जयश्री महालकर,मंजुषा हातकंगणे, सीता ढाकणे कपिल बनकर , इरशाद पठाण, यांचा सहभाग होता

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending