December 4, 2024

Khultabad : सावधान!! खुलताबाद उर्स निमित्ताने वाहतूक मार्गात बदल: असा असेल पर्यायी मार्ग..

0
Contact News Publisher

धुळे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुक मार्गात दि.९ ते २० दरम्यान बदल

खुलताबाद शहरात जर-जरी-जर बक्ष उर्स व ईद ए मिलाद या सणानिमित्त होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता दि.९ ते २० दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

Khultabad Urs : जरजरी बक्ष उर्स सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Khultabad खुलताबाद शहरात दि.९ पासून दि.२० पर्यंत जरजरी बक्ष उर्स तर दि.१६ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा होणार आहे. खुलताबाद शहरात यानिमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पैरहन मुबारक दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे या कालावधीत धुळे सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हे बदल दि.९ ते २० दरम्यान सायंकाळी ६ ते सकाळी ८ यावेळात लागू राहतील,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतुकीतील बदल याप्रमाणे–

फुलंब्री कडून – कन्नड व धुळे कडे जाणारी सर्व जड वाहतूक – ही औरंगाबाद – शरनापूर फाटा – माळीवाडा- वरझडी- कसाबखेडा- देवगाव रंगारी- शिऊर-तलवाडा घाट मार्ग चाळीसगाव – धुळे कडे जाईल.

धुळे – कन्नड कडून येणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट- शिऊर- देवगाव रंगारी- कसाबखेडा- वरझडी-माळीवाडा- संभाजीनगर(औरंगाबाद )मार्गे फुलंब्री कडे जाईल.

अल्पवयीन मुलीची घाटीत प्रसूती, प्रियकराने दिला धोका; वाचा 2 राज्यातील क्राईम कहाणी- औरंगाबाद

संभाजीनगर औरंगाबाद खुलताबाद मार्गे चाळीसगाव – धुळे कडे जाणारी जड वाहतूक ही औरंगाबाद – माळीवाडा- कसाबखेडा फाटा- देवगाव रंगारी – शिऊर- तलवाडा घाट मार्गे चाळीसगाव कडे जाईल.

धुळे – चाळीसगाव कडून खुलताबाद मार्गे संभाजीनगर औरंगाबादकडे जाणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट शिऊर – देवगाव रंगारी- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा मार्गे संभाजीनगर औरंगाबादकडे जाईल.

वेरुळ – खुलताबाद कडून फुलंब्री कडे जाणारी वाहतुक ही वेरुळ – कसाबखेडा फाटा- माळीवाडा मार्गे औरंगाबादकडे जाईल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending