December 4, 2024

World Tourism Day 2024 | वेरूळ | पर्यटन स्थळे, पर्यटक माझी जबाबदारी, अनेकांनी घेतली शपथ

0
Contact News Publisher

पर्यटनस्थळे आणि जागतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधीक्षक पुरातत्वविद, डॉ. शिवकुमार भगत यांनी केले. ते आज पत्र सूचना कार्यालय Pib press information , मुंबईने वेरुळ, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या माध्यम कार्यशाळेत बोलत होते. पत्र सूचना कार्यालयाच्या उप संचालक जयदेवी पुजारी स्वामी, जिल्हा माहीती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी, डॉ. मिरा ढस, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, भारत पर्यटन विभागाच्या सहायक संचालिका मालती दत्ता, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे सहायक अधिक्षक पुरातत्वविद प्रशांत सोनवणे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

ZP YOJNA | जिल्हा परिषद उपकरांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना; लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करा-जिल्हा प्रशासन

 

डॉ भगत म्हणाले की, मराठवाडयातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुरातत्व विभाग जागतिक पर्यटन स्थळांचा तसेच पर्यटन स्थळांचा विकास करण्याबरोबरच जागतिक स्थरावर ही पर्यटन स्थळे पोहचविण्यासाठी प्रचार करत आहे. जागतिक वारसा संवर्धनात स्थानिकांची भूमिका फार महत्त्वाची आहे, एकप्रकारे ते ब्रँड अम्बॅसेडर असल्याचं भगत म्हणाले. आपापल्या परिसरातील जास्त परिचीत नसलेल्या पर्यटन स्थळांना विविध माध्यमातून प्रसिद्धी देण्याची आवश्यकता भगत यांनी व्यक्त केली. तसेच वारसास्थळांचे जतन करण्यासाठी गर्दीवर नियंत्रणही महत्त्वाचे असल्याचे भगत म्हणाले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; ऑनलाईन अर्ज सुरू | अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पर्यटनाचे अनेक आयाम सध्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे पर्यटन संस्कृतीचा विकास होणे आवश्यक आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने म्हणाले. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये पर्यटन संस्कृती विकसित करण्यासाठी स्थानिक माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पायाभूत सुविधांसह पर्यटनस्थळावर पर्यटकांना मिळणारी वागणूक महत्वाची असून, स्थानिक पातळीवर सौहार्दपूर्ण वातावरण असले पाहिजे, असे दुसाने म्हणाले.

 

PM आवास योजना (शहरी) औरंगाबाद/संभाजीनगर; दाखल अर्जदारांच्या यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारत पर्यटन विभागाच्या सहायक संचालक, मालती दत्ता यांनी ‘शाश्वत पर्यटन- पर्यावरणपूरक पर्यटनासाठी नवोन्मेष’ या विषयावर मार्गदर्शन केले.

पर्यटन स्थळे तसेच वारसा स्थळांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती शक्य आहे, त्यासाठी माध्यमांनी जागृती केली पाहिजे, अशी अपेक्षा मालती दत्ता यांनी व्यक्त केली. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात छत्रपती संभाजीगनर येथील लेण्यांचा समावेश असल्याने या वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी स्थानिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मिशन लाइफ अंतर्गत पर्यावरण-अनुकूल वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाची माहिती  तसेच वार्तालाप ग्रामीण माध्यम  परिषद या कार्यक्रमाच्या अयोजनामागची भूमिका  स्पष्ट केली.
यावेळी पत्रकार विजय चौधरी श्रीकांत कुलकर्णी देवदत्त कोठारे यांनी मनोगत व्यक्त केले.

World Tourism Day 2024

जागतिक पर्यटन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो वेरुळ लेणी, जिल्हा संभाजीनगर येथे 27 व 28 सप्टेंबर असे दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो, पत्र सूचना कार्यालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

दवाखान्याचे टेन्शन मिटले; राशन कार्ड कोणतेही असो आता ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत!; समजून घ्या..

या दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन स्थळी देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त स्वरुपात माहीती देण्यात  आली आहे,  पर्यटकांना अत्यंत कमी वेळात देशभरातील महत्वाच्या  पर्यटन स्थळांची माहिती घेता येईल. केंद्र सरकारव्दारे पर्यटनाला चालना व पर्यटन स्थळांचा विकास विकास करण्यासाठी राबविण्यात येणा-या महत्वाच्या योजनांची तसेच विविध पर्यटन स्थळांची माहीती एलईडी स्क्रिन व्दारेही देण्यात येत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शाहीर सुरेश जाधव यांच्या माध्यमातून पर्यटकांचे मनोरंजन पर्यटन स्थळाची माहिती आणि महाराष्ट्रातील विविध वारसा स्थळाचे प्रदर्शन ही करण्यात येत आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे, याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोने केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending