December 4, 2024

Crime news | दामिनी पथकाने १२ टावळखोरांना पकडले | कन्नड परिसरात कार्यवाही

0
Contact News Publisher

दामिनी पथक आणि कन्नड शहर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे कन्नड शहर हद्दीतील बस स्टॅन्ड, पिशोर नाका व इतर गर्दीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी सतर्कपणे गस्त करून विनाकारण फिरणाऱ्या 12 टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 अन्वये कारवाई केली आहे. Crime news

कन्नड शहर हद्दीतील शिवाजी महाविद्यालय, वाल्मीक नाईक फार्मसी कॉलेज, वसंतराव नाईक आश्रम शाळा तेलवाडी या दोन ठिकाणी भेट दिली असून सुमारे 80 मुलींना महिला सुरक्षा महिलांविषयी कायदे याबाबत सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना काही अडीअडचणी असल्यास तात्काळ दामिनी पथकाबरोबर संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दामिनी पथकाचे भित्तीपत्रके महाविद्यालयाच्या दर्शनी भागात चिकटवण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भापकर पोलीस ठाणे कन्नड शहर यांच्यासह दामिनी पथकाचे सपोनी आरती जाधव, पोलीस नाईक कपिल बनकर, पोलीस अंमलदार इर्शाद पठाण महिला पोलीस अंमलदार जयश्री महालकर तसेच कन्नड शहर पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार सुभाष पवार, दिनेश खेडकर उपस्थित होते

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending