BJP v NCP | महायुतीत बिगाडीला सुरुवात! आमदार सतीश चव्हाण गंगापूर-खुलताबाद विधानसभा लढणार’चं | अधिकृत घोषणा
- नावेद शेख,
- क्राईम टाईम्स ब्युरो
राज्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांची युती असतांना अनेक मतदारसंघात महायुतीच्या आमदारांमध्ये अंतर्गत विरोध दिसत आहेत. BJP v NCP याचे उत्तम उदाहरण म्हणजे गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार असलेले भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या तीन वर्षांपासून तयारी करत काल अधिकृतपणे निवडणूक लढणारचं अशी घोषणा केली आहे.
E-Shram: असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन : उपायुक्त
या घोषणेने महायुतीत बिगाडी आल्याचे अधिकृत लेबल लागले आहेत तर याप्रकरणी आमदार प्रशांत बंब यांना विचारणा केली असता आमच्या नेतेमंडळीना सर्व माहिती आहे मात्र त्यांना हेही माहीत आहेत की आमदार बंब समोर कोण्ही निवडणूक लढवली तर टिकणार नाही म्हणून तेही लक्ष देत नाही अन् सतीश चव्हाण यांना 70 हजारच्या लिडणे हरवणार असल्याचे बंब यांनी सांगितले आहे
गंगापूर-खुलताबादच्या जनतेला बदल हवा आहेत गेल्या तीन वर्षांपासून तयारी करतोय मतदारसंघातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि राज्यात युती असली तरी उमेदवारी सर्वेच्या आधावर असते पक्षाने दिली तर ठीक नाहीतर वेळेवर पाहू अशी प्रतिक्रिया सतिश चव्हाण यांनी दिली आहे
विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गांवे, वळ्या, वस्त्या पर्यन्त या तीन वर्षात विकास पाहोचला आहेत या मतदारसंघात सध्या विकासाची स्पर्धा सुरू आहे अनेक वयक्तिक लाभाच्या योजनांचे फॉम् भरणे पर्यंत या दोन्ही आमदारांमध्ये स्पर्धा दिसत आहेत.
जनता म्हणते सवकनचा फरक असतोच
कोण्ही कितीही बोललं मला काही फरक पडत नाही तरी सवकनचा फरक असतोच आणि यांचे उदाहरण आपल्या समोर गेल्या तीन वर्षांपासून दिसत आहेत आणि असले स्पर्धक प्रत्येक मतदारसंघात पाहिजेत जेणेकरून कोण्ही विकासापासून वंचित राहणार नाही.