December 4, 2024

लाडक्या बहिणींला सरकार’कडून द‍िवाळीचा गिफ्ट मिळणार | दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार | विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारच..

0
Contact News Publisher

दिवाळीपूर्वीच ladki bahin लाडक्या बहिणींसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सणांचा राजा दिवाळी येत आहे. या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हलचल सूरू केली आहे. लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. Ladki bahin yojna maharashtra govt diwali gift 

 

ZP YOJNA | जिल्हा परिषद उपकरांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना; लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करा-जिल्हा प्रशासन

ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी खेळी खेळली आहे. या योजनेचे तीन हप्ते जमा झाले आहेत. महायुती सरकार विधानसभेच्या रणधुमाळीत अर्धी लढाई अगोदरच जिंकण्याची तयारी करत आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूम धडाका असेल. त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे.

मुदत वाढणार का?
या योजनेतंर्गत कोट्यवधींचा निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सुरूवातीला महिलांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली. त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती. ती उघडावी लागली. यापूर्वी ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत अजून वाढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांचे बँके खाते उघडले नाही. एखादं कागदपत्रं कमी पडल्याने त्यांना लाभ मिळाला नसेल तर आता त्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; ऑनलाईन अर्ज सुरू | अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending