खुश खबर!! नोंदणीकृत कामगारांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये बोनस
दिवाळीपूर्वी सर्व बांधकाम कामगारांना बोनस मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने मुंबई आझाद मैदान येथे ८ ऑक्टोबर २४ रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने नोंदीत बांधकाम कामगारांना बोनस देण्याचा निर्णय केल्याने निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी यांनी केले आहे.
Government Jobs 2024: पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; फडणवीसांची माहिती
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर यापूर्वी चर्चा केली. चर्चेमध्ये कॉ. शंकर पुजारी यांनी प्रधान सचिव यांना बोनस देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत दिली. त्यानुसार निर्णय करू, असे आश्वासन शिष्टमंडळास विनिता सिंगल यांनी दिले होते. शिष्टमंडळात साथी सागर तायडे यांचाही समावेश होता. एक महिन्यापूर्वी कामगारमंत्री सुरेश खाडे यांना बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने निवेदन देऊन कामगारांना बोनसचा निर्णय करावा, असे निवेदन देण्यात आले होते.
PM KISAN YOJANA | शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला 4000 रुपये येणार | कृषी मंत्री धनंजय मुंडे
याबाबत विचार करू, असे आश्वासन कामगारमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले होते. त्यानंतर निवारा बांधकाम कामगार संघटना व इतर कामगार संघटनांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल करण्यात आलेली होती. त्या रिट पिटिशनचा निकाल तारीख १/१२/२०२१ रोजी होऊन बोनस देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनास दिलेला होता.