मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी जावेद अ.खालीक तर सदस्यपदी वसीम शेख यांची नियुक्ती
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची कार्यकारणी जाहीर झाली असून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी सोयगाव येथील जावेद अब्दुल खालेक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे उप सचिव मोईन ताशिलदार यांनी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यासोबतच राज्यातील विविध भागातील एकूण दहा सदस्यांची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. मुबई येथील मुश्ताक अंतुले हे महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
तैयुब सिकंदर शेख बीड , मुजीब रूमाने रत्नागिरी, सलीम सारंग नवी मुंबई ,अल्ताफ पेवेकर मुंबई ,अजगर कासार मुकादम ठाणे, फारुख महंमद शेख पुणे, फरहान खान अहमद खान नाशिक ,शेख वसीम शेख अजीम सिल्लोड ,अहमद शरीफ अब्दुल बाशीद देशमुख तसेच कुलदीपसिंग सुरी खारघर नवी मुंबई यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावर अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष तसेच अशासकीय सदस्यांचा विविध संघटना तसेच मान्यवरांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.