December 3, 2024

खुलताबाद पंचायत समितीचा अजब कारभार; दाखल प्रस्ताव प्रलंबित तर दाखल नसलेले शकडो प्रस्ताव परस्पर मंजुर..

0
Contact News Publisher

खुलताबाद पंचायत समितीच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाचा अजब कारभार समोर आला आहेत काल दिवसभरात अनेक शेतकरी पंचायत समितीच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग मध्ये विहीर,गाय गोठा, वृक्ष लागवड या योजनांचे प्रस्ताव मंजूर न झाल्याच्या कारणास्तव आरडाओरडा करत कर्मचाऱ्यांना प्रस्ताव प्रलंबित सल्याबाबत जाब विचारत होते narega khultabad

खुश खबर!! नोंदणीकृत कामगारांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये बोनस

शेतकऱ्यांनी अनेकवेळा या कार्यलयात चकरा मारल्याचे समोर झाले तर प्रस्ताव मंजूर होईल म्हणून बोलतात मात्र मंजुरी देत नाही आमच्या नंतरचे गावांतील अनेकांचे मंजूर होऊन बिले निघाली आमच्या प्रस्तावांना मंजुरी का मिळत नाही असे प्रश्न शेतकरी उपस्थित कर्मचाऱ्यांना करत होते संबंधित सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांना प्रत्येक्षात बोललो मात्र त्यांनी वेळकाढूपणा केला असल्याचे अनेक शेतकरी तक्रारी करत होते.

याप्रकरणी आलेल्या अनेक शेतकऱ्यांना विचारपूस केली असता शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून विहीर,गायगोठे, वृक्ष लागवडसह अनेक योजनांचे फाईल प्रस्ताव दाखल केलेले असल्याचे बोलले आहेत मात्र मंजुरी देत नसल्याची तक्रारी शेतकरी करत होते

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नॉट रीचेबल; माहिती देण्यास नकार

विहीर, जनावरांचे गोठेसह या कार्यलयामार्फत सुरू असलेल्या इतर योजनांचे दाखल असलेल्या एकूण प्रस्ताव किती व मंजूर झालेले प्रस्ताव किती याबाबत संबंधित कनिष्ठ लिपिक यांना विचारणा केली असता माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांना भेटण्याचा प्रयन्त केला मात्र कार्यलयात उपस्थित नहोते व संपर्क केला मात्र फोन बंद असल्याचे कारण समोर आले आहे.

कार्यलयात प्रस्ताव दाखल (इनवलंड) नसतांना प्रस्ताव मंजूर

कार्यलयातील खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार प्रस्ताव संचिका दाखल नसतांना व कार्यलयात प्रस्ताव उपलब्ध नसतांना शेकडो (अधिकृत आकडा हजारोत असू शकतो) प्रस्तावांना परस्पर मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे व लोकसभ आचारसंहितेच्या वेळी घाई घाई हजारो प्रस्तावांना असेच परस्पर मंजूर झाल्याचे सांगितले आहे मात्र या कार्यलयात यापेक्षाही अनेक प्रकरण उघड होण्याची शक्यता आहे.

गटविकास अधिकारी कार्यलयात उपस्थित नसल्यामुळे अधिक माहिती मिळाली नाही अधिकृत माहिती प्राप्त झाल्यावर भाग २ मध्ये सविस्तरपणे बातमी प्रसिद्ध करू..

खुलताबादेत आ.बंब’कडून ५ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending