December 3, 2024

आमदार बंब यांना धक्का! खंदे समर्थक सुरेश सोनवणे विरोधात गंगापूर-खुलताबाद निवडणूक लढणार

0
Contact News Publisher

फॉम् भरणार, लढणार परत घेणार नाही – सुरेश सोनवणे

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नावेद शेख -9011117423

आमदार प्रशांत बंब यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणूक लढणार म्हणून आज अधिकृत घोषणा केल्यामुळे राजकिय वातावरण चांगलाच तापला आहे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना मोठा झटका बसला आहेत

सुरेश सोनवणे अपक्ष म्हणून निवडून लढवणार असल्याचे जाहीर केले आहेत मात्र जर जरागे पाटील यांनी मला उमेदवारी दिली तर जनतेचा आशीर्वाद समजून सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन लढणार अन् जिकणार कारण आहे खुलताबाद माझी जन्मभूमी आहेत तर गंगापूर माझी कर्म भूमी आहेत आणि दोन्ही तालुक्यातील ३८५ गावांतील सर्वे केले आहेत प्रत्येक गावांत माझे शेकडो कार्यकर्ते आहेत.

खुलताबाद पंचायत समितीचा अजब कारभार; दाखल प्रस्ताव प्रलंबित तर दाखल नसलेले शकडो प्रस्ताव परस्पर मंजुर..

गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होतो मतदारसंघातील प्रत्येक गावांतील सर्वे करून घेतले आहेत आज तुम्हाला मी एकटा दिसत असेल मात्र ३० तारखेला माझ्या मागे राज्यातील अनेक मोठे नेते दिसतील

अनेकवेळा संधी देऊनही मतदारसंघाचा विकास नाही..

विकासाच्या नावाखाली गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या घोषणाबाजी करतात आणि निवडून आल्यावर सर्व विसरून जातात जनतेनी यांना अनेकवेळा संधी दिली मला एकवेळा संधी द्या म्हणून जनतेसमोर जाणार

BJP v NCP | महायुतीत बिगाडीला सुरुवात! आमदार सतीश चव्हाण गंगापूर-खुलताबाद विधानसभा लढणार’चं | अधिकृत घोषणा

फॉम् भरणार आणि लढणार परत घेणार नाही

अनेक लोक दिशाभूल करतील मात्र मी निवडणूक लढण्यावर ठाम आहेत फॉम् भरणार म्हणजे भरणार लढणार म्हणजे लढणार परत घेणार नाही कुठं नेऊन ठेवलंय या मतदारसंघाला निवडणूक आली तर मतदारसंघात येतात अनेक घोषणा केल्या मात्र प्रत्येक्षात कोणताही विकास या मतदारसंघात झालेला नाही

अनेक धमक्या आल्या मात्र घाबरत नाही..

निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर अनेक धमक्या आल्या मात्र घाबरत नाही जनतेच्या भल्यासाठी मैदान उतरलो आहे काही झालं तर परत घेणार नाही

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending