Crime news | तीस वर्षीय महिलेचा खून; प्रेत ठेवले घरातच पुरून | लासूर स्टेशन परिसरातील घटना

- क्राईम टीम औरंगाबादप्र
- तिनिधी:सचिन कुशेर
जालना येथील एका तीस वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला असून सदर महीलेचे नाव मोनिका सुमित निर्मळ(३०) असे असून
Crime news chhatrapati sambhajingar
सदरील घटना शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील लासूर स्टेशन येथे उघडकीस आली असून सदरील महिला ही जालना येथून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असल्याने ती दररोज सकाळी आठ वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे ने येत असे तसेच सायंकाळी सहा वाजेदरम्यान रेल्वेने जालना येथे घरी जात असे परंतु ती दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ड्युटी साठी आली परंतु पुन्हा घरी परतलीच नसल्याने त्याच दिवशी तिचे वडील मार्कस झांबरे यांनी आपली मुलगी मोनिका ही बेपत्ता असल्याची तक्रार कदिम नगर येथील पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्या नंतर कदिम नगर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून त्यांनी लासूर स्टेशन येथील एका संशयितास ताब्यात घेतले होते
त्यास खाकिचा रंग दाखविताच तपासाचे चक्र फिरले दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजेदरम्यान कदीम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरे यांनी बेपत्ता महिलेच्या वडिलांना फोन करून सांगितले आहे तुम्ही लासूर स्टेशन येथे आमच्या सोबत तपासामध्ये चला तुमच्या मुलीचे प्रेत लासूर स्टेशन येथील इरफान शेख याने त्याच्या शेतातील एका रूम मध्ये पुरून ठेवले असल्याचे तो सांगत असून त्याची खात्री करून ओळख पटवून द्या असे आम्हाला सांगितले त्या नंतर आम्हीं सर्व नातेवाईक तेथे गेलो असता नायब तहसीलदार आणि पोलिसांनी पंचनामा करून एका स्त्री जातीचे नग्न अवस्थेतील प्रेत उकरून बाहेर काढले सदरील प्रेत हे मोनिकाचे असल्याचे निष्पन्न झाले त्या नंतर मोनिकाची आई सुनीता मार्कस झांबरे यांच्या फिर्यादीवरून इरफान शेख याच्या विरोधात मोनिकावर अत्याचार करून तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत पुरून ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून ह्या प्रकरणामागे अजून दुसरा कोणी मास्टरमाइंड आहे का पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करत आहे….
मोनिका आणि सुमित निर्मळ यांचा २०२३ मध्ये झाला होता परंतु दोघांचे सतत वाद होत असल्याने एके दिवशी इरफान शेख याने आम्हाला फोन करून सांगितले होते की तुम्ही त्या दोघांना लासुर स्टेशन येथे पाठवून द्या,त्यांना मी रूम घेऊन देतो,ते इथेच राहतील म्हणून आम्ही देखील इरफान शेख यास ओळखत होतो-सुनीता झांबरे(मोनिकाची आई)