पाणलोट यात्रेस गोळेगाव ता. खुलताबादपासुन सुरुवात

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत पाणलोट यात्रेचा प्रारंभ मौजे. गोळेगाव, तालुका खुलताबाद येथून शनिवारी (दि.८) करण्यात आला.
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नावेद शेख
आयुक्त, मृद व जलसंधारण तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा प्रकाश खपले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अपर आयुक्त (जलसंधारण) मृद व जलसंधारण आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर नितीन दुसाने, प्रादेशिक जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित कुमार परांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी .आर .देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी जालना एस .एस. वाघमारे, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव समन्वय अधिकारी नरेंद्र कटके, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर वेंकटेश ठके, तालुका कृषी अधिकारी खुलताबाद ज्ञानेश्वर तारगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी खुलताबाद लांडगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पैठण राठोड, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी शेख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी छत्रपती संभाजीनगर श्रीमती अरदवड, सरपंच गोळेगाव श्रीमती आवटे, उपसरपंच संतोष जोशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Crime news | एनडीपीएस पथकावर हल्ला; आरोपी अबरार शेख फरार, सहा जण ताब्यात
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोळेगाव येथील शेततळे कामाचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.तसेच महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी करून उपस्थितांना पाणलोटबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी पाणलोट शपथ घेतली. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कलापथकांनी पाणलोट जनजागृतीसाठी पोवाडा सादर केला.
नवी नंबरप्लेट आवश्यक | RTO कडून ३१ मार्चपर्यंत मुदत | कोणत्या वाहनासाठी किती पैसे भरावे लागणार?
मंडळ कृषी अधिकारी पैठण पाडळे, कृषी पर्यवेक्षक खुलताबाद गायट, डेंगळे, जिल्हा प्रकल्प समन्वयक मिलिंद वानखेडे, तालुका समन्वयक किशोर डी.कोल्हे, तालुका समन्वयक सुनिल एस. खोतकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक जालना टी. एल. भोजने तसेच जलसंधारण विभागातील अधिकारी/ कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महिला बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय जलसंधारण अधिकारी लांडगे यांनी आभार मानले.