Land naksha | शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी आज कन्नडपासून सुरुवात ; केंद्रशासनामार्फत ‘नक्शा’

‘नक्शा’ प्रकल्पाचा आज (दि.१८) कन्नड येथे प्रारंभ
केंद्रशासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करुन अद्यावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’
National geospatial Knowledge based land Survey of urban Habitations: NAKSHA
उपक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यात प्रथदर्शी प्रकल्प म्हणून कन्नड नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या ड्रोन सर्व्हेक्षणाचा प्रारंभ मंगळवार दि.१८ रोजी सकाळी ११ वा. कन्न्ड तहसिलदार कार्यालयात होत आहे.
नवी नंबरप्लेट आवश्यक | RTO कडून ३१ मार्चपर्यंत मुदत | कोणत्या वाहनासाठी किती पैसे भरावे लागणार?
या कार्यक्रमास खासदार संदिपान भुमरे, आ. संजनाताई जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,उपसंचलक भुमी अभिलेख किशोर जाधव यांनी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा कन्नड नगरपरिषदेचे प्रशासक संतोष गोरड, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख डॉ.विजय वीर, तहसिलदार विद्याचरण कडवकर, उपअधीक्षक भुमी अभिलेख कैलास मिसाळ यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.
Crime news | एनडीपीएस पथकावर हल्ला; आरोपी अबरार शेख फरार, सहा जण ताब्यात
ग्रामिण भागातील जमिन मोजणी व मालमत्ता कार्ड तयार करुन देण्यासंदर्भात नुकताच स्वामित्व प्रकल्प राबविण्यात आला. त्याच धर्तीवर शहरी भागातील जमिन मोजणी करुन मालमत्ता कार्ड देण्याबाबत ‘नक्शा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यात १० नगरपालिका क्षेत्रामध्ये हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड नगरपालिकेचा समावेश आहे. कन्नड नगरपालिकेचे ४.८० चौरस किलोमिटर क्षेत्रातील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले जाईल. त्याद्वारे प्रत्येक मालमत्तेचे अचुक नकाशे तयार करुन मालमत्ताधारकास दिले जातील. त्याचा पहिला टप्पा ड्रोन सर्व्हेक्षण हा आहे. याच प्रकल्पाचा मंगळवार दि.१८ रोजी प्रारंभ होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख डॉ. विजय वीर यांनी कळविले आहे.