Ration card of government employees canceled | सरकारी कर्मचार्यांचे रेशनकार्ड रद्द | पुरवठा विभागाचा दणका

पुणे : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे साडेपाच हजार रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. त्यात शासकीय सेवेत कार्यरत असतानाही धान्याचा लाभ घेणार्यांची संख्या चार हजार 438 इतकी असून, या सर्वांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. तर दोन ठिकाणी नावे असणार्यांनाही पुरवठा विभागाने दणका दिला असून, अशा एक हजार 125 जणांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत.
Ration card of government employees canceled
जिल्ह्यात आठ लाख रेशनकार्डधारक जिल्ह्यात प्राधान्य योजना तसेच अंत्योदय योजनेत एकूण कार्डधारकांची संख्या आठ लाख चार हजार 452 इतकी आहे. त्यात प्राधान्य योजनेत पाच लाख 81 हजार 937, शुभ्र कार्डधारक 24 हजार 802, राष्ट्रीय अन्न सुरक्षायोजनेत एक लाख 48 हजार 796 तर अंत्योदय योजनेत 48 हजार 917 इतके कार्डधारक आहेत.
नवी नंबरप्लेट आवश्यक | RTO कडून ३१ मार्चपर्यंत मुदत | कोणत्या वाहनासाठी किती पैसे भरावे लागणार?
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील पाच हजार 563 जणांचे कार्ड रद्द करण्यात आले आहे. त्यात शासकीय कर्मचार्यांची संख्या चार हजार 438 इतकी आहे. तसेच दोन ठिकाणी नावे असलेल्या एक हजार 125 जणांवर कारवाई दोन ठिकाणी रेशनकार्ड असणार्यांचे कार्ड रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत.
BANK AADHAR LINK | तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे? | असे करा चेक
तसेच आधार जोडणीतून अशा कार्डधारकांची माहिती मिळत असून, या दुबार नावे असलेल्या कार्डधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 1 हजार 125 कार्ड रद्द केले आहेत.
महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे
शासकीय कर्मचारी असूनही धान्याचा लाभ घेणार्यांचा शोध घेऊन अशांचे रेशनकार्ड बंद केले आहेत. दुबार नावे असणार्यांचेही कार्ड बंद करण्याची मोहीम सुरू आहे.