माँ मातंगी दिव्य धामचा दुबईत भव्य सन्मान – भारत माता आणि सनातन संस्कृतीचा जागतिक गौरव

खुलताबाद येथील अॅड. अविनाश औटे हे गेले अनेक वर्ष माँ मातंगी दिव्य धाम सोबत जोडले गेले असून माँ मातंगी दिव्य धाम, एक अद्वितीय आध्यात्मिक केंद्र, जे आपल्या अनोख्या धार्मिक उपक्रमांसाठी ओळखले जाते, नुकतेच रायपूर, छत्तीसगड श्री. बगलामुखी महायज्ञात 11 टन लाल मिरचीची आहुती देऊन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहे. हा यज्ञ डॉ. श्री. प्रेमासाई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला असून यामध्ये लाखो भक्तांनी सहभाग घेतला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या अनोख्या महायज्ञाची नोंद करण्यात येत आहे.
PM Kisan yojna : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात ‘या’ तारखेला येणार
पूज्यनीय डॉ. श्री. प्रेमासाई महाराज हे एक जागतिक कीर्तीचे संत असून सनातन धर्माचे प्रचारक आणि भारतीय संस्कृतीचे महान वारसदार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्तिक महायज्ञ, सुदर्शन चक्र महायज्ञ, तसेच बगलामुखी हवन यांसारख्या अनेक भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. बगलामुखी महायज्ञात 11 टन लाल मिरचीची आहुती दिल्यामुळे या यज्ञाने अनोख्या जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी मोठी प्रमाणात मिरची जळूनही कोणालाही श्वासाचा त्रास, खोकला किंवा अस्वस्थता जाणवली नाही; उलट सर्व भक्तांनी आध्यात्मिक उर्जा आणि शांतीचा अनुभव घेतला.
श्री बगलामुखी महायज्ञ हा संकट निवारण, आर्थिक समृद्धी आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली यज्ञ मानला जातो. हा यज्ञ दुर्मीळ असून, डॉ. श्री. प्रेमासाई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या यज्ञामुळे संपूर्ण समाजावर सकारात्मक प्रभाव पडला आहे.
माँ मातंगी धामच्या या जागतिक विक्रमामुळे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव जागतिक स्तरावर झाला आहे. हा सन्मान म्हणजे भारतीय आध्यात्मिक परंपरांचा जागतिक मंचावर सन्मान असून, भारतीय संस्कृतीच्या महान परंपरांना यामुळे एक नवीन ओळख मिळाली आहे.
सन्मान स्वीकारण्यासाठी महाराष्ट्राचे भूमिपुत्र अॅड. अविनाश आनंदराव औटे यांची निवड सदर सन्मान स्वीकारण्यासाठी डॉ. श्री. प्रेमासाई महाराज यांनी सुप्रसिद्ध विधिज्ञ तथा माँ मातंगी धामचे प्रमुख विश्वस्त अॅड. अविनाश आनंदराव औटे यांची निवड केली आहे. अॅड. अविनाश औटे हे आपल्या विधी क्षेत्रातील अनुभवासोबतच धार्मिक आणि सामाजिक कार्यातही सक्रिय योगदान देत आहेत. श्री बगलामुखी महायज्ञाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
हा सन्मान सोहळा दुबईतील अटलांटिस, पाम या भव्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवरील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून माँ मातंगी धामच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव केला जाणार आहे.
भारतीय संस्कृतीचा हा सन्मान सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. माँ मातंगी धामच्या या जागतिक यशामुळे भारताची आध्यात्मिक शक्ती आणि सनातन धर्माचा जागतिक स्तरावर विस्तार होण्यास महत्त्वाची चालना मिळाली आहे.