INDIAN ARMY JOBS | सैन्य भरतीः ऑनलाइन अर्ज सुरू | इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करा..

भारतीय सैन्यभरतीसाठी ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) वर्ष २०२५-२६करीत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी
या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२ मार्च ते १० एप्रिल दरम्यान आपले अर्ज दाखल करावे. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे.
Khultabad jobs | खुलताबादेत अंगणवाडी सेविकांची पाच, मदतनिसांची 68पदे भरणार
पहिला टप्पा-संगणक आधारित लेखी परीक्षा (CEE) निश्चित CBT केंद्रांवर घेतली जाईल. अग्निवीर लिपिक/ SKT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागेल.
दुसरा टप्पा- CEE उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी भरती मेळाव्यादरम्यान घेतली जाईल.
नवी नंबरप्लेट आवश्यक | RTO कडून ३१ मार्चपर्यंत मुदत | कोणत्या वाहनासाठी किती पैसे भरावे लागणार?
तिसरा टप्पा- भरती मेळावा सैन्य भरती कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी आयोजित केला जाईल. त्याआधी उमेदवारांची अनुकूलता चाचणी (Adaptability Test) आणि वैद्यकीय चाचणी होईल. उमेदवारांनी चाचणीसाठी योग्य बॅटरी बॅकअप आणि 2GB डेटा असलेला स्मार्टफोन बरोबर आणावा.
अग्निवीर उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन गटांसाठी अर्ज करता येईल. मात्र, त्यांना प्रत्येक गटासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल आणि स्वतंत्र प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागेल. तथापि, भरती मेळावा व वैद्यकीय चाचणी फक्त एकदाच दिली जाईल.
खेळाडूंना, NCC प्रमाणपत्रधारकांना, ITI आणि डिप्लोमा धारकांना विशेष गुण देण्यात येणार आहेत.
नोंदणी, परीक्षेची प्रक्रिया आणि सराव चाचणी याबाबत माहिती देणारे व्हिडिओ भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी
संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांनी कोणत्याही दलाल किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये,असे भरती संचालक अनुज सिंघल यांनी कळविले आहे.