खुशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला;पण…
खुशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला;पण…
मुबंई / वृत्तसंस्था
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना प्रत्येक एसटी कामगार संघटनेच्यावतीने पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे मासिक वेतन कर्मचा-यांना देण्यासंबंधात एसटी महामंडळाकडुन योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त ), महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस यांच्यावतीने वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्य मंत्री यांना पत्रव्यवहार केला गेला होता.एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याबाबत राज्य शासनाकडे विविध सवलतींच्या प्रतिपुर्तीचा शिल्लक निधी मिळण्याबाबत महामंडळाकडुन प्रस्ताव पाठवला गेला होता. तो निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु होते. संघटनेच्या नेतृत्वाकडुन वेतन देण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते. या सर्व प्रयत्नांमुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच माहे एप्रिल महिण्याचे देय मासिक वेतन कर्मचा-यांना देण्यासंबंधात रा.प.महामंडळाकडुन योग्य त्या सुचना देण्यात येतील.
एस टी कर्मचारी वेतनाचा तिढा एका महिन्यापूरता सुटला
लॉकडाऊनमुळे लालपरी पूर्णतः बंद आहे. उत्पन्न थांबल्याने 1लाख 7हजार कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण राज्य सरकारने सवलतीची प्रतीपुर्ती असलेल्या ५४७ लाख रकमेपैकी २५० कोटी एसटीला देऊ केल्याने एका महिन्या पुरता वेतनाचा तिढा सुटला आहे. ही रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यानी केली होती. लॉकडाऊन काळात अत्यंत बिकट परिस्थिती एसटीला सवलतीच्या थकबाकीची रक्कम देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सोडविल्या बद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त करत आहोत
.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एसटी कर्मचा-यांचे वेतन एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्यात अदा करण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रवास सवलत मुल्यांच्या पुर्तीप्रतिपोटी दयावयाच्या रकमेसह एप्रिल या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ३०० कोटी रूपये एस.टी. महामंडळास द्यावेत. जेणेकरुन एस.टी. कर्मचा-यांचे वेतन अदा होईल अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीतून २५० कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एस.टी कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असून १ लाख ५ हजार कर्मचा-यांना वेतन मिळणार आहे.
– मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
मान्यताप्राप्त संघटनेच्यावतीने एसटी कामगारांचे वेतन होणाऱ्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे देय मासिक वेतन कर्मचा-यांना देण्यात येणार आहे.
.- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्ट्रेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना