*Braking news आज आणखी 41 रुग्ण वाढले जिल्ह्यात 1 हजार 117 कोरोनाबाधित रुग्ण*
*Braking news बुधवारी आणखी 41 रुग्ण वाढले
जिल्ह्यात 1 हजार 117 कोरोनाबाधित रुग्ण*
प्रतिनिधी / 20 मे
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सकाळी 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 117 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलिस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5(2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), संजय नगर (1), सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे.
पुंडलिक नगर दोन वेळा रुग्ण संख्या का दाखवत आहे रोजच्या न्युज मादे पुंडलिक नगर दोन वेळा दाखवण्यात आले आहे
जिल्हा प्रशासनाकडून माहिती येत असते त्यामध्ये आम्ही काही बदल करू शकत नाही!