September 23, 2024

*ब्रेकिंग न्युज – अवैधरीतीने जाणारा देशी दारूचा मोठा साठा जप्त, वाळूज पोलिसांची कार्यवाही*

0
Contact News Publisher

अवैधरीतीने जाणारा देशी दारूचा मोठा साठा जप्त, वाळूज पोलिसांची कार्यवाही

  • क्राईम टाईम्स नेटवर्क
  • वाळूज / हूरखान पठाण

अहमदनगर कडून औरंगाबाद कडे जाणारा देशी दारूचा छोटा हत्ती वाळूज पोलिसांनी जप्त केला आहे .भिंगरी संत्रा ब्रांड असलेले सुमारे पाच लाखाचे मुद्देमाल सह आरोपी चंद्रकांत किसन गायकवाड (२२) रा श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यास अटक केली आहे . तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे . गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल दावत समोर सापळा लावला होता . रविवार ३१ रोजी सकाळी ८:०० वाजता एक छोटा हत्ती क्रमांक एम एच १७ बी वाय १५०३ ला अडवून चौकशी केली असता त्यात देशी दारूचे ३५ बॉक्स प्रत्येकी ४८ बॉटल मिळून आले . ज्याची किम्मत ८५, ९०४ रुपये व छोटा हत्ती किम्मत ४ लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . ही कार्यवाही पो नि संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शन खाली पो उप लक्ष्मण उंबरे , पो शि पांडुरंग शेळके , पो कॉ प्रदीप बोरुडे , पो कॉ किशोर साबळे यांच्या पथकाने केली आहे . याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending