December 4, 2024

ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचे अदृश्य हात, भाजप नेत्याच मोठं विधान

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंतचे कल पाहता पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार आहे. आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार २०० पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. तृणमूल काँग्रेसने आतापर्यंत २०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ७८ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अदृश्य हात असल्याचे म्हणत भाजपच्या (BJP) नेत्याने खळबळ उडवून दिली आहे.

…अन् ‘ मृतदेह ’ चक्क उठून उभा राहिला, पोलिसही हैराण

प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारात प्रत्येक्ष सहभाग घेतला नसला तरी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडले. त्यामुळे मतविभागणी रोखली गेली. आणि त्याचा फटका भाजपला बसला. एकप्रकारे त्यांचे अदृश्य हात ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी काम करत होते’.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा सत्ता?, तर भाजपची जोरदार मुसंडी

दरम्यान, शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनंदन तुमच्या जबरदस्त विजयावर! आपण लोकांच्या कल्याणासाठी आणि कोरोनाविरोधात आपण एकत्रितपणे लढू या. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अभिनंदन ममतादीदी, तृणमूलच्या विजयासाठी केलेला संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending