डॉक्टर म्हणाले सात, मात्र माली येथे महिलेने दिला तब्बल नऊ बाळांना जन्म

0
The-doctor-said-seven-but-the-woman-in-Mali-gave-birth-to-nine-babies
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

बामाको : माली या पश्चिम आफ्रिकन देशातील गर्भवतीने चक्क एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसूतीपूर्वी डॉक्टरांनी महिलेच्या गर्भात सात अर्भक असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रसुतीवेळी तिच्या गर्भातून नऊ बाळांनी जन्म घेतला. बाळंतीण आणि नऊही बाळं सुखरुप (woman in Mali gave birth to nine babies)असल्याची माहिती माली सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

…अन् ‘ मृतदेह ’ चक्क उठून उभा राहिला, पोलिसही हैराण

२५ वर्षीय हलिमा सिझ हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला. पश्चिम आफ्रिकेतील मालीसारख्या गरीब देशातील ही महिला आहे. तिची अधिकाधिक काळजी घेऊन प्रसुती करण्यासाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्को या उत्तर आफ्रिकन देशात स्थलांतरित करण्यात आले होते. सुरुवातीला महिलेच्या गर्भात सात बाळं असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. मोरोक्को सरकारने मात्र या अतिदुर्मीळ प्रसुतीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मोरोक्को आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्या देशातील रुग्णालयात अशी प्रसुती झाल्याची माहिती नसल्याचं सांगितलं. परंतु माली सरकारने हलिमाने पाच मुलगे आणि चार मुलींना जन्म दिल्याची घोषणा केली. सिझेरियन करुन तिची प्रसुती करण्यात आली.

सावधान ! औरंगाबाद शहरात कलम 37(1) (3) लागू

प्रसूत झालेली महिला आणि तिचे नऊही बाळं ठणठणीत आहेत. काही आठवड्यात ते माली देशात परत जातील, अशी माहिती मालीच्या आरोग्य मंत्री फँटा सिबी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिली. दोन्ही देशांच्या आरोग्य यंत्रणांचं त्यांनी अभिनंदनही केलं. मात्र हलिमाची प्रकृती आणि नऊ बाळांनी तग धरण्याबद्दल स्थानिक वर्तमानपत्रांनी शंका उपस्थित केली आहे.

जिल्ह्य़ातील १०६ गावांमध्ये प्रवेशबंदी!

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *