भारतात लवकरच २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस, ट्रायलला मंजुरी

- क्राईम टाईम्स टीम
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची (Corona Outbreak) तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने येत्या काही दिवसात भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. भारतात २ ते १८ वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला भारत बायोटेकला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस (Corona vaccine) देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
एका तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल ५२५ मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल घेण्यात येणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज 3ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज २ चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.
२ ते १८ वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज २ आणि फेज ३ च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस केली होती. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ १८ वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.