सासरच्या जाचास कंटाळून नवंविवाहतेची आत्महत्या | वैजापूर

- क्राईम टाईम्स टीम
- प्रतिनिधी-सचिन कुशेर
सविस्तर बातमी.
वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी असलेले वाल्मीक भाऊसाहेब त्रिभुवन यांचा विवाह दि 1 एप्रिल 2021 रोजी गंगापूर तालुक्यातील खादगाव येथील अर्पिता नानासाहेब पाटेकर हिच्याशी झाला होता,परंतु हा विवाह लॉक डाऊन चालु असल्याने साध्या पध्दतीने लावून देण्यात आला होता त्या अनुषंगाने तिचे सासू सासरे व नवरा तिला वारंवार त्या विषयी उलट सुलट बोलत असत व तुझ्या आई वडिलांनी आपला विवाह साध्या पद्धतीने केला असून त्यांच्याकडून तू आपल्याला गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये अशी लग्न झाल्यापासून वारंवार मागणी करत होते
त्या बद्दलची माहिती तिने आपल्याला वडिलांना काही दिवसापूर्वी दिली होती त्या जाचास कंटाळून अर्पिता ही काल पहाटे 4 ते 5 वाजेपासून घरातून गायब झाली होती तिचा आम्ही काल दिवसभर शोध घेतला पण ती आम्हाला कोठेही मिळून आली नव्हती,परंतु आज सकाळी निमगाव येथील शेत गट क्र-50 मध्ये असलेल्या एका विहिरी मध्ये तीचे प्रेत तरंगत असल्याचे काही इसमांना दिसून आले याची माहिती त्यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील शिवाजी गायकवाड यांना कळविली दरम्यान पोलीस पाटील यांनी सदर ची माहिती शिवूर पोलिसांना देताच शिवूर पोलीस ठाण्याचे सपोनि गोरख शेळके यांच्यासह कर्मचारी आर आर जाधव,कुलदीप नरवडे,संदीप धनेधर, गणेश गोरक्ष,सुभाष बकले यांच्यासह LPC शिकेतोड,काहिटे,भुरे यांनी घटनास्थळी जाऊन सदर प्रेतास विहिरी बाहेर काढून घटनेचा पंचनामा करत त्यास शवविच्छेदन साठी शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून सदर मयत नवविवाहतेच्या वडिलांच्या फिर्यादिवरून शिवूर पोलीस ठाण्यात भादवी कलम
498अ,304ब,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि गोरखजी शेळके करत आहे.
आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरली जाणार; राजेश टोपेंची माहिती