September 22, 2024

*ब्रेकिंग न्युज-औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर अपघात एक ठार; जिकठाण परिसरात घटना*

0
Contact News Publisher

दुचाकीस अज्ञात वाहानाने उडवले , दुचाकीस्वार ठार, औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील घटना

वाळूज / हूरखान पठाण

दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना
रविवारी ३१ मे रोजी रात्री ८:३० च्या सुमारास औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर असलेल्या जिकठाण फाट्याजवळ च्या २० नंबर खोली जवळ घडली.
दादासाहेब एकनाथ गायके (५५ )रा सुलतानाबाद, ता गंगापूर जि औरंगाबाद )असे मयतचे नाव आहे .
जामगाव येथून दादासाहेब एकनाथ गायके औरंगाबाद कडे ( दुचाकी क्रमांक – एम एच -२०
-बीएफ -१६२७ ) वरुन आपल्या मुलीकडे जात होते . माहिती मिळताच
वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत वडनेरे घटना स्थळी दाखल झाले व जखमीस उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल केले . उपचारादरम्यान मध्यरात्री एक जुन रोजी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला .
मुलगा
विक्रम दादासाहेब गायके यांच्या फिर्यादीवरुन ठाणे अंबलदार शेख सलीम यांनी अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो उप नि लक्ष्मण उंबरे सह पो कॉ सुरेश कचे हे करीत आहे . ( फोटो = अपघातग्रस्त दुचाकी तर इंसेट मध्ये मयत दादासाहेब गायके )

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending