मुख्यमंत्रिपदाबाबत फॉर्म्युला ठरलेला नाही, नाना पटोलेंची गुगली

- क्राईम टाईम्स टीम
मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पूर्ण पाच वर्ष शिवसेनेकडे राहील का, हा मुद्दा सध्या राजकारणात चर्चेत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) याना विदर्भात याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याच्या उत्तरात नानांनी – मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे उत्तर देऊन गुगली टाकली.
दरम्यान, विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले व मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असेही म्हणालेत.
… ही जनभावना
शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले मत सांगितले, तसे मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेसने स्वबळावर लढावे, ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही, असे म्हणून नानांनी मोदींना टोमणा मारला.