*धक्कादायक बातमी-आज औरंगाबाद जिल्ह्यात 63 रुग्णांची वाढ; पहा कोणत्या भागात किती रुग्ण*
*धक्कादायक बातमी-आज औरंगाबाद जिल्ह्यात 63 रुग्णांची वाढ; पहा कोणत्या भागात किती रुग्ण*
औंरगाबाद, दि.04 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1767 झाली आहे. यापैकी 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 89 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 565 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बेगमपुरा (2), लेबर कॉलनी (1), पडेगाव (1), बायजीपुरा (1),हर्सुल परिसर (1), भारतमाता नगर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), रोशन गेट (2), देवळाई चौक परिसर (1), समर्थ नगर (1), शिवशंकर कॉलनी (5), शिवाजी कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), चेतना नगर (2), एन-सात सिडको (1), एन-2विठ्ठल नगर (1),विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), बारी कॉलनी (1), हनुमान नगर, गारखेडा (1), मील कॉर्नर (1), एन चार (1), क्रांती नगर (1),विजय नगर, गारखेडा (1), एन सहा संभाजी कॉलनी (6), अयोध्या नगर (1), न्यू हनुमान नगर (1), कैलास नगर (1), अजिंक्य नगर, गारखेडा (3),एन 1,सिडको (1), सुंदर नगर, पडेगाव (1), गणेश कॉलनी (2), एन चार , समृद्धी नगर,सिडको (2), कटकट गेट, नेहरू नगर (1), आंबेडकर नगर, एन -7 (3), जय भवानी नगर (1), राजा बाजार (4), अन्य (6) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
*खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू*
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या 43 वर्षीय पुरूष रुग्णाचा 03 जून रोजी सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 70, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 18, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 89 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
*****