September 22, 2024

धक्कादायक! औरंगाबादेत प्रसूतीनंतर बाधित मातेचा मृत्यू; बाळ सुखरूप

0
Contact News Publisher

धक्कादायक! औरंगाबादेत प्रसूतीनंतर बाधित मातेचा मृत्यू; बाळ सुखरूप

औरंगाबाद / वृत्तसंस्था

औरंगाबाद : शहरातील नेहरू नगर येथील ३० वर्षीय बाधीत प्रसूत महिलेचा कोरोनामुळे मृत्यूझाल्याची धक्कादायक घटना चार जून रोजी घडली. जिल्ह्यातील हा सर्वात कमी वयाचा मृत्यूठरला असून एकूण ९३ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, बाळ सुखरूप असून त्याचा पहिला स्वॅब निगेटिव्ह आला असून दुसऱ्या स्वॅबच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे,अशी माहिती डॉ अरविंद गायकवाड यांनी दिली.

नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय गर्भवती महिलेला २८ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रसूतीनंतर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने महिलेला पाच वेळेस डायलेसिस देण्यात आले होते. शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होत असल्याने कृत्रिम श्वास देण्यात आला होता. त्यानंतर औषधोपचाराला शरीराने साथ न दिल्याने या बाधित मातेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला, असे डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या अठराशे पार
दरम्यान, जिल्ह्यात ५९ बाधितांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८२८ झाली आहे. यापैकी ११३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतमाता नगर १, इंदिरानगर न्यू बायजीपुरा १, न्यू कॉलनी, रोशन गेट १, भावसिंगपुरा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, बेगमपुरा १, चिश्तिया कॉलनी १, फाझलपुरा १, रेहमानिया कॉलनी १, गांधी नगर १, युनूस कॉलनी २, जुना मोंढा, भवानी नगर १, शुभश्री कॉलनी, एन सहा १, संत ज्ञानेश्वर नगर, एन ९ येथील १, आयोध्या नगर, एन सात ७, बुडीलेन ३, मयूर नगर, एन अकरा १, विजय नगर, गारखेडा ३ सईदा कॉलनी १, गणेश कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजलपुरा १, रोशन गेट परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, औरंगपुरा २, एन आठ सिडको १, समता नगर ४, ‍मिल कॉर्नर २, जवाहर कॉलनी ३, मोगलपुरा २, जुना मोंढा १, नॅशनल कॉलनी १, राम मंदिर, बारी कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी १, देवडी बाजार १, एन सात सिडको १, एन बारा १, आझाद चौक १, टी.व्ही. सेंटर एन अकरा १, कैलास नगर १, अन्य १ असे १९ महिला आणि ४० पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending