खुलताबाद उर्स महोत्सवला कोरोनाच्या अटीशर्तीत परवानगी : वाचा नियमावली

- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
आज दिनांक.09/10/2021 रोजी हजरत जर जरी जर बक्ष रहे.खुल्ताबाद यांचा 735 वा उर्स, महोत्सव निमित्त उर्स व्यवस्थापन समितीची बैठक सकाळी ठिक 11.00 नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यांत आली होती. सदर बैठक उर्स व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार श्री.सुरेंद्र देशमुख, तहसील कार्यालय, खुलताबाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीस मा. श्री. फजिलत अहेमद महमद ईसाक, दर्गा कमेटी अध्यक्ष तथा उर्स व्यवस्था समिती, मा. श्री. राहुल सुर्यवंशी मुख्याधिकारी नगरपरिषद तथा सचिव उर्स व्यवस्था समिती, श्री. अॅड. एस. एम. कमर, नगराध्यक्ष तथा उर्स समिती सदस्य, मा. श्री. सिताराम मेहेत्रे, पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन, श्री. कोलते, श्री. सावजी, सार्वनिक बांधकाम उपविभाग, खुलताबाद, श्री. डॉ. सुहास जगताप, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय, खुलताबाद श्रीमती, सौ. एस. एम. कुरुकमाने, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, खुलताबाद व उर्स व्यवस्थासमिती सदस्य श्री. अॅड कैसरोद्दीन हाजी जहिरोद्दीन, सदस्य उर्स व्यवस्था समिती, श्री महमद नईम महमद बक्ष, सदस्य उर्स समिती, श्री. सुरेश मरकड, उपाध्यक्ष, नगरपरिषद खुलताबाद श्री शरफोद्दीन महमद रमजानी, अध्यक्ष दर्गा कमेटी हद्दे खुर्द, श्री.संभाजी भिमराव वाघ, प्रशासकीय अधिकारी श्री. अंकुश रुस्तुम भराड पाटील, प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद खुलताबाद उसे व्यवस्था नियुक्ती श्री. शब्बीर अहेमद, श्री. सुदाम मुरुकुंडे, श्री. अशोक जगताप, श्री. अशोक शंकर भंडारे. श्री. सचिन तॉडेवाड, पाणीपुरवठा अभियंता, तसेच खुलताबाद शहरातील पत्रकार बंधु, आदी उपस्थित होते. यावेळी उर्स समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार यांनी शासनाने दिनांक 06/10/2021 रोजीचे दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बाबत खालील सूचना दिल्या आहेत.
नियमावली
1. 65 वर्षा वरील जेष्ठ नागरीक, गरोदरमाता व 10 वर्षा खालील लहान मुले यांनी घरीच रहावे.
2. उर्स च्या ठिकाणी शक्यतोवर व्यक्तीकडे कमीकमी 06 फुट शारीरीक/समाजिक अंतरे ठेवणे आवश्यक आहे.
3. मासचा वापर करणे बंधनकारक आहे. विना मास कोणालाही दर्शनास परवानगी असणार नाही. 4. हात साबणाने वांरवार धुवुन घेणे व नियमितपणे हँड सॅन्टाजरचा वापर करावा.
5. या ठिकाणी येणा-या सर्व भावीक नागरीक, सेवेकरी यांनी स्वतःच्या आरोग्याचे निरिक्षण करावे व आजारी असल्यास स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य प्रशासनास कळवावे.
6. उसे दरम्यान कोणत्याही दुकाने/हॉटेल्स. टी स्टॉल, फुलांची दुकाने, फळांची दुकाने, खाँज्याची दुकाने इतर सर्व किरोळ दुकाने, तसेच मनोरंजनाचे साधन, तसेच राहट पाळणे, इत्यादी पुर्णपणे बंद राहतील.
7. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पुर्णपणे प्रतिबंध असेल, तसेच त्यांचे उल्लंग्न केल्यास स्थानिक प्रशासना कडून दंडाची कारवाई करण्यांत येईल.
8. उर्स / धार्मिक स्थळामध्ये दर्शन हे न थांबता व गर्दी न होता, Flow.मध्ये करावे..
9. मास घालुन जे उसे धार्मिक विधी करता येते. त्यांच विधीना परवागनी असेल. 10. उर्स / धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे. या ठिकाणी येणारे सर्वांना आरोग्य सेतु ॲप चा वापर करणे अनिवार्य आहे.
11. उर्स / धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे च्या ठिकाणी फक्त कोविड-19 ची लक्षणे नसलेल्य व्यक्तीनांच प्रवेश राहील.
12. चप्पल/बुट/ पादत्राणे स्वतःच्या वाहनात/गाडीत ठेवावे.
13. पुतळे / मूर्ती / पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्याची परवानगी नाही.
14. उर्स / धार्मिक/ प्रार्थना स्थळे च्या ठिकाणी मोठया प्रमाणपत गर्दी करण्याची परवानगी राहणार नाही.
15. संसगांचा विचार करता, भंजणे इ. भक्ती गिते कव्वाली गाण्यासाठी एकत्र येणा-या व्यक्तींना पारवागी असणार नाही.
16. ऐकमेकांना अभिवादन करतांना शारीक संपर्क टाळण्यांत यावा. 17. उसे धार्मिक प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व सेवेकरी, यांनी कोविड-19
सुरक्षा नियमावली पाळणे बंधनकारक असेल, तसेच सर्वांना कोविड-19 चाचणी करणे आवश्यक असेल.
तरी येणा-या सर्व भावीकांना नागरीकांना वरील सूचानांचे काटेकोर पालन करावे व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उर्स व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा मा.तहसिलदार यांनी केले आहे.