September 23, 2024

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १ डिसेंबरपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र आता मंत्रिमंडळानं १ डिसेंबरपासून पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पण शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर जास्त असणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, रेशन दुकानांमध्ये ५ किलो गहू-तांदुळ मोफत मिळणार

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता. मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्याप्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती कोरोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

१०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा, आचारसहिंता लागू

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending