September 23, 2024

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा वाढणार

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम
  • मंत्रिमंडळनिर्णय

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे सदस्यांची संख्या २००० वरुन २२४८ इतकी होईल. तसेच पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील ४००० वरुन ४४९६ इतकी होईल.

महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून वंचित रहावे लागू नये यासाठी प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

#कोविड19 च्या #ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवून संसर्गाला वेळीच रोखता येईल, अशा सूचना मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending