…हा आमच्या खिशावर दरोडा; कोरोनाच्या नव्या नियमांबाबत व्यापाऱ्यांचा संताप

- क्राईम टाईम्स टीम
मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ने जग धास्तावले आहे. सतर्कता म्हणून महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे नवे निर्बंध घोषित केले आहेत. यात कोणी दुकानात किंवा मॉलमध्ये बिनामास्क आदळला तर संबंधित दुकान मालकाला व मॉलला मोठा दंड होणार आहे. हा आमच्या खिशावर दरोडा आहे, असा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
नवे नियम
राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार कोणी बिनामास्क बाहेर फिरताना आढळल्यास ५०० रुपये दंड होईल. पण, कोणी दुकानात बिनामास्क आढळला तर दुकानदाराला दहा हजार रुपये आणि कोणी मॉलमध्ये बिनामास्क आढळला तर मॉलला पन्नास हजार रुपये दंड होणार आहे.
जनजागृती करा
या नियमांचा दुकानदार आणि व्यवसायिकांनी विरोध केला आहे. नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी सरकारने जगजागृती करावी, मास्क न घातल्यास एका विशिष्ट रकमेपर्यंत दंड देखील आकारण्यात यावा, असे सुचवले. ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांकडून दहा ते पन्नास हजारांचा दंड वसूल करण्याचा नियम करण्यात याला आहे तो आमच्या खिशावर दरोडा टाकण्याचा नियोजित ‘प्लॅन’ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. आधीच मागच्या दोन लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये हा अव्वाच्या सव्वा दंड भरायचा कसा? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केला आहे.