September 23, 2024

Post Office jobs: भारतीय टपाल विभागात दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

भारतीय टपाल विभागात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पटना यांनी विविध पदांसाठी भरती आयोजित केली आहे. एकूण ६० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.
एकूण पदांची संख्या – 60 पदे

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 
1) पोस्टल सहाय्यक 31
2) MTS 13
3) वर्गीकरण सहाय्यक 11
4) पोस्टमन ०५

शैक्षणिक पात्रता : 
पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंटसाठी- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेकडून किमान 60 दिवस कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पोस्टमन/मेल गार्डसाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण. स्थानिक भाषेचे म्हणजेच हिंदीचे ज्ञान. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेकडून किमान 60 दिवस कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
MTS – 10वी उत्तीर्ण. स्थानिक भाषेचे म्हणजेच हिंदीचे ज्ञान.

वय श्रेणी:
एमटीएस – 18 ते 25 वर्षे
इतर – 18 ते 27 वर्षे
परीक्षा फी : 100 रुपये /-

वेतनमान:
पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक – रु. 25500-81100 प्रति महिना
पोस्टमन – 21700-69100 रुपये प्रति महिना
MTS – रु 18000-56900 प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२१

याप्रमाणे अर्ज करा
पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. तुम्ही तुमचा अर्ज 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी “सहाय्यक संचालक (भरती), 5 वा मजला, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पाटणा – 800001” वर पाठवू शकता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending