September 23, 2024

राज्यात पुढच्या २४ तासात पावसाची शक्यता; मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचे हवामान खात्याचे आवाहन

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

मुंबई :- मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई शहरांबरोबरच उपनगरांमध्येही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील २४ तास जोरदार पाऊस राहणार आहेत. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने दिले आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending