अवैध धंदे बोकाळले म्हणून तंटे वाढले; झरी/वडगावच्या ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील झरी / वडगाव येथिल मारोती मंदिर समोर आयोजित ग्रामसभेत विविध विषय कामाचे ठराव तसेच अंदाजपत्रक नागरिकांच्या सूचनेनुसार करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच श्री. करण राजपूत हे होते. ग्रामसेवक ए. बी. बनसोडे साहेब यांनी ग्रामसभेतील विषय व अंदाज पत्रकाबाबत सांगितले. तहकूब ग्रामसभेत वर्ष २०२२ – २०२३ चे गावअतर्गत काम बाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आले. यात ग्रामस्थांनी विविध कामे सुचवली.
असे विविध विषय व गावा अंतर्गत विकास कामाबाबत सन २०२२ – २०२३ चे अंदाजपत्रक नागरिकांच्या सूचनेवरून ठराव करण्यात आले. विषय 2)ग्रा.हद्दीतील महसूल विभाग मधील अवैध धंदे बोकाळले म्हणून गावातील अनेक विषयांवरील तंटे वाढले सदरील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.गायरान जमिनी वर राहणाऱ्या नागरिकांना कर आकारणी करण्यात यावी आदी विषय घेण्यात आले.
यावेळी उपसरपंच विठ्ठल साळुंके, दिपक चंदवाडे, टिळक चंदवाडे, मोहन ताटू , चंदन चंदवाडे, सचिन चंदवाडे,गोवर्धन चंदवाडे, गणेश झुरावत, राधाकिसन ताटू , राजू पटेल युवराज, राजू महेर सुरेश राऊत
रामेश्वर चंदवाडे, संतराम चंदवाडे, जीवन चंदवाडे, चंदन झुरावत, सुरेश राऊत, संदीप राऊत, सुरेश मोरे, कल्याण महेर आदीसह नागरिक उपस्थित होते. शेवटी ग्रामसेवक ए.बी.बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले.