September 22, 2024

चिचोंली येथील शेतकर्‍याच्या मृत्यू प्रकरण आरोपीला अटक; 302 अन्वये गुन्हा दाखल

0
Contact News Publisher

चिचोंली येथील शेतकर्‍याच्या मृत्यू प्रकरण आरोपीला अटक,आरोपींविरूध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल

  • क्राईम टाईम्स नेटवर्क
  • वसीम शेख

चिचोंली (ता .औरंगाबाद) येथे शुक्रवार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बांध नांगरण्यावरून झालेल्या हाणामारी प्रकरणात मृत्यू पावलेला तरूण शेतकरी कुष्णा रामराव वाघ (वय 38) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका आरोपींला शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली असून आरोपींविरूध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बाबासाहेब रामराव वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी कुष्णा रामराव वाघ (वय 38) या शेतकर्‍याची औरंगाबाद तालुक्यातील चिचोंली शिवारात गट नंबर 25 मध्ये शेती असुन कुष्णा आणि त्याच्या भावकीतीलच असलेला उध्दव वाघ याची शेती शेजारीच आहे. कुष्णा वाघ आपल्या शेतीच्या बांधावर ट्रक्टरच्या सहाय्याने जमीनीचा बांध नांगरीत असतांना कुष्णा वाघ व उध्दव वाघ यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची होऊन त्याचे
रुपांतर जोरदार हाणामारीत झाले.उध्दव वाघ याने कुष्णा वाघ याला जबर मारहाण केली होती.या मारहाणीत तो गंभीररित्या जखमी होवुन जागेवर कोसळला. यानंतर उध्दव वाघ याने कुष्णाला गंभीररीत्या अवस्थेत पाहुन घटनास्थळावरून पळ काढला, गंभीर जखमी झालेल्या कुष्णाला तात्काळ पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत शेतकर्‍याचा भाऊ बाबासाहेब वाघ यानी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी उध्दव लक्ष्मण वाघ याच्याविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी रात्री उशीरा चिकलठाणा पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी , विशाल नेहुल चिकलठाणा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे,

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending