September 22, 2024

महावितरणला सभापतीचा इशारा; शेतकऱ्यांची लाईट कट केल्यास, शेतकऱ्यांचा ‘महा’ आंदोलन

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील रोहित्र (डि.पी) बंद न करण्याबाबत सभापती गणेश नाना आधाने यांचा पत्र

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद तालुक्यातील रोहित्र ( डी.पी) बंद करण्यात येऊ नये याबाबत मा. आमदार श्री. प्रशांतजी बंब साहेब यांनी मा.कार्यकारी अभियंता, औरंगाबाद यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला आहे. तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टिमुळे अडचणीत आले आहेत. शेतक-यांचे सर्व पीकांचे नुकसान होऊन कोणत्याही प्रकारचे उत्पन्न शेतक-यांच्या हातात आलेले नाही. शेतक-यांचे पुढील पीक आल्यानंतर शेतकरी विद्युत देयके भरण्यास तयार आहेत. शेतक-यांची आर्थीक व नैसर्गीक अडचण विचारात घेऊन तालुक्यातील शेतीतील रोहित्र (डी.पी) बंद करण्याची मोहिम थांबविण्यात यावी. अन्यथा तालुक्यातील शेतक-यांसह दि. १०/१२/२०२१ पासून आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच ठिय्या आंदोलना मुळे होणा-या उद्रेकाची व परिणामांची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे,जी.प.उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, जी.प.सदस्य सुरेश सोनोने, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, उपसभापती युवराज ठेंगडे, सतिष दांडेकर, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, मा.उपसभापती दिनेश अंभोरे, मा.उपसभापतीपती प्रकाश चव्हाणसह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending