September 22, 2024

औरंगाबादेत गुप्तधनाचे अमिष दाखवून लाखो उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो..

0
Contact News Publisher

संग्रहित छायाचित्र

  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद तुमच्या घरात 96 किलो गुप्तधन (Guptdhan) असून ते शोधण्यासाठी 9 लाख 95 हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबाला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police ) अटक केली. परभणीहून गुप्तधनाची पाहणी करण्यासाठी तो औरंगाबादला आला होता. त्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली.

भोंदूबाबानं कसं अडकवलं जाळ्यात?

याबाबत शेख रफत शेख करीम (गवळीपुरा, छावणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात सतत अशांतता आणि वाद होते. त्यामुळे मित्राने त्यांना मानवत येथील सायलू महाराजांची भेट घडवून दिली. जून महिन्यात रफत, त्यांची पत्नी आणि मित्र मानवतला गेले. परंतु त्यांना सीताराम महाराज भेटला. तेथे ‘तुमच्यावर करणी केली आहे,’ असे सांगून सीतारामने औरंगाबादमध्ये येऊन पाहणी करण्यासाठी 96 हजार रुपये मागितले. त्यानुसार रफत यांनी पैसे दिले. त्यानंतर सीताराम महाराज, शंकर, महाराज आणि इतर औरंगाबादेत आले.

घरात गुप्तधन असल्याचे अमिष

औरंगाबादेत आल्यानंतर तुमच्या घरावर सापाचा साया आहे, घरात 96 किलो गुप्तधन आहे, ते काढून देण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार वेळोवेळी सोन्याचे दागिने आणि पैसे मागितले. अखेर रफत यांनी परभणीत सीताराम महाराजांची भेट घेऊन त्यांना पैसे परत मागितले. पण पैसे परत मिळणार नाही. माझ्याकडे अघोरी विद्या आहे. त्याची कोठेही वाच्यता केली तर कोंबडा बनवीन, अशी धमकी दिली. त्यानंतर रफत यांनी या सर्व प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

सखोल तपासासाठी पोलीस कोठडी

या भोंदूबाबला पोलिसांनी अटक केली असून त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending