September 22, 2024

अंधारी परिसरात दूध उत्पादक शेतकरी संकटात…

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी :सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरातील पशू पालक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय दूध उत्पादन आहे. पण पशूखाद्य, चारा, यांचे वाढलेले भाव, पण मात्र दुधाला कमी भाव मिळत असल्याने ते हैराण झाले आहेत. लॉकडाऊन पूर्वी दुधाचे दर समाधानकारक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. परंतु, टाळेबंदीनंतर दुधाचे भाव कमी झाले आहेत. यातच पशुखाद्याचे भाव मात्र तेजीत आहेत. पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा चढ्या भावाने मिळत आहे. तर दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा, चारा हे पशुखाद्य घेणेसुद्धा अवघड झाल्याने शेतकऱ्यांची अडचणी वाढल्या आहेत.

औरंगाबादकरानो दोन दिवसांत दुसरा डोस न घेतल्यास ‘कडक’ कारवाई- जिल्हाधिकारी

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून लॉकडाऊन पूर्वी म्हशीचे दुध ४oते ४२ रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करत होते. अन् आता हेच दूध ३५ते ३६ रुपये लिटर प्रमाणे खरेदी होत आहे. तर गाईच्या दुधाला लॉकडाऊन पूर्वी ३० ते ३२ रुपयांपर्यंत दर होते. ते आता केवळ २५ ते २६ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. यात शेतकऱ्यांनी कष्ट घेऊनही त्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांची किमान ४० ते ४२ रूपये लीटर पर्यंत गाईच्या दुधाच्या दराची अपेक्षा केली आहे.
__________________________

प्रतिक्रिया…..

राजू तायडे ,पंढरीनाथ तायडे शहाजीराजे दुध केंद्र चालक
____________________________

दुधाला चांगला भाव मिळायला हवा. तरच हा व्यवसाय टिकेल. यावर दुध उत्पादकांना कर्ज, अनुदान मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पशुधनाची किंमत वाढत आहे. पशुखाद्यवरही शासनाचे नियंत्रण असायला हवे. पाण्यापेक्षा दुधाला भाव कमी आहे.

-विष्णू सोनवणे दूध उत्पादक शेतकरी अंधारी
_____________________________

दुधाच्या पावडरचा भाव घसरला, तर लगेच दुधाचे भाव कमी होतात. दहा लिटर दुध देणारी गाय असेल तरच परवडते, नाहीतर परवडत नाही. अन् व्यवसाय परवड नाही म्हणून काहींनी व्यवसायच सोडून दिला आहे….

सिद्धेश्वर मोहिते दूध उत्पादक शेतकरी अंधारी
_________________________
दिवसभरात एका गाईला साधारणतः हा तीन वेळेस पोटभर चारा लागतो यापैकी एक वैरण कोरडे व दोन वैरण हिरवे , व सकाळ, संध्याकाळ एका वेळेस कमीत कमी दोन किलो सरकी पेंन्ड म्हणजे चार्याचे आज स्वतःकडे चारा उपलब्ध आहे म्हणून १०० ते १४० रूपये व सरकी पेंन्ड दोन वेळेस ६५ ते ७० रूपये, माणसाचा रोज २५० ते ३०० रूपये एकुण ५१० रूपये खर्च येतो. जर एखादी गाय ८ लिटर दूध देत असेल तर ८×३० =२४० +२४० =४८० रूपये असे पैसे मिळतात उलट २० ते ३० रूपये शेतकऱ्यांला खिशातून खर्च करावे लागत आहे. आज शेतकऱ्यांला फक्त शेणखतच मिळत उत्पन्न मात्र शून्य अशी परिस्थिती दुध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

अंधारी येथील दूध खरेदी केंद्रावर विक्री करताना शेतकरी डेअरीचे संचालक मंडळ (छायाचित्र: दीपक सिरसाठ )

औरंगाबादेत गुप्तधनाचे अमिष दाखवून लाखो उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो..

नोकरीची सुवर्ण संधी, 25 हजार रिक्तपदे भरणार; अशी करा नोंदणी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending