September 21, 2024

खुलताबादेत लस घेण्यास विलंब करणाऱ्या कुटूंबाची ओमायक्रॉनसह विविध चाचण्या होणार

0
Contact News Publisher

लसीचा पहिला डोस न घेणाऱ्यांचे RTPCR चाचणी करून कार्यवाही करण्याच्या तालुका प्रशासनाला सूचना अन्यथा तुमचे पगार बंद तर दुसरा डोस पात्र व्यक्तीचा ऑनलाइनवर डेटा तयार

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

कोरोना पाठोपाठ राज्यात ओमीक्रोनचा धोका निर्माण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी शंभर टक्के लसीकरण व्हावे म्हणून अनेक सक्तीचे पाऊल उचलले आहेत मात्र तरी देखील काही टक्के लोकांनी लस घेतली नसल्याने प्रशासनासमोर शंभर टक्के लसीकरणाचे आव्हान निर्माण झाले आहेत त्यामध्ये वरिष्ठ प्रशासनाने लसीचा दुसरा डोस बंधनकारक करून पात्र नागरिकांचे ताबडतोब लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा नियोजन पूर्ण काम करण्याच्या तयारीला लागली आहे

शंभर टक्के लसीकरणच्या पार्श्वभूमीवर आज खुलताबाद येथील भक्त निवास सभागृहात औरंगाबाद मुख्यकार्यकरी अधिकारी निलेश गटणे, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, उपजिल्हा आरोग्यधिकारी अभय धानोरकर, तहसिलदार सुरेंद्र देशमुख,गटविकास अधिकारी प्रवीण सुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण शिंदे,वैधकीय अधिकारी डॉ बलराज पांडवे, डॉ.अंजुम निलोफर, डॉ.पुगळे पाटील, विस्तार अधिकारी हरकचंद काहाटे, विस्तार अधिकारी ससाणेसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शहर व तालुक्यातील दुकानदारांची आजपासून तपासणी

खुलताबाद शहर व तालुक्यात लसीचा पहिला व दुसरा डोस न घेणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत तर आजपासून प्रत्येक दुकानांची तपासणी सुरू होणार आहेत

खुलताबाद तालुक्यात पहिला तोड 97% पूर्ण झाला आहेत तर खुलताबाद शहरात तीन हजार नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याचे समोर आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending