September 21, 2024

कन्नड चिकलठाण-लोणी-बोडखा-इंदापूर-बाजारसावंगी-गणोरी मार्गाचा कायापालटणार

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील कन्नड चिकलठाण – लोणी – बोडखा – इंदापूर – बाजारसावंगी – गणोरी राज्य मार्ग 219 या मार्गांचाही समावेश

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची संसद भवन येथे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी भेट घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील तीन राज्य मार्गाचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्ग करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्री गडकरी यांच्या कडे केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, वैजापूर नगराध्यक्ष दिनेश परदेशी, उद्योजक राम भोगले, संदीप निकम यांची उपस्थिती होती.

या मध्ये खुलताबाद तालुक्यातील कन्नड चिकलठाण लोणी – बोडखा- इंदापूर बाजारसावंगी गणोरी रस्त्याला राज्य मार्गाचा, राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी ही करण्यात आली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना दिले.

देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैजापूर श्रीरामपूर हा रस्ता अस्तीत्वातील राज्य मार्ग क्रं 51 हा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, त्यामुळे राष्ट्रीय

मार्गक्रं 752- एच (वैजापूर शहरापासुन) ते राष्ट्रीय महामार्ग क्रं. 360 असा जोडून राष्ट्रीय महामार्ग दर्जोनती केल्यास या रस्त्यावरी दळण वळण व्यवस्थीत चांगली होईल, करिता दोन्ही राष्ट्रीय महामार्ग जोडण्यास विनंती करण्यात येते. तसेच तलवाडा, जानेफळ, खंडाळा, परसोडा अस्तीत्वातील प्रजिमा 27 हा राष्ट्रीय महामार्ग 752 एच व राष्ट्रीय महामार्ग क्रं. 752-1 व 752 जी ला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्ता हा राष्ट्रीय महागार्ग म्हणुन दर्जेन्नत झाल्यास

या रस्त्यावरी दळण वळण व्यवस्थीत होईल. तसेच राज्य मार्ग – 219 कन्नड चिकलठाण बाजारसावगी नायगांव -> हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन दर्जेन्नत केल्यास कन्नड खुलताबाद व फुलंबी अशा तीन तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत होऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यास उपयुक्त होईल. तरी औरंगाबाद जिल्ह्यातील या तीन रस्त्यांचा राष्ट्रीय महामार्गमध्ये दर्जोनंती व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending