खुलताबादेत घरकुल ‘ड’ यादी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; अकरा गावांचा समावेश; तुमचं नाव असेल तर..
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील एकरा गावांत पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल प्रपत्र ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती सदरील प्रपत्र ड यादी मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्यकार्यकरी अधिकारी निलेश गठणे यांनी सांगितले तर प्रपत्र ड यादी मंजूरीच्या अंतिम टप्प्यात असून तलाठी ग्रामसेवक समितीच्या अहवाल प्राप्त होताच मंजुरीची कार्यवाही होणार असल्याचे सांगितले आहे
संबंधित ग्रामसेवक, तलाठी यांना प्रपत्र ड यादीचे सर्वेक्षण करून अहवाल लवकरात लवकर पाठवण्याचे आदेश दिले आहे.
घरकुल बांधकामसाठी जागा उपलब्ध करून देणार
ज्या लाभार्थीकडे घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल त्यांना तहसीलदार यांच्याकडे जागेची मागणी करावी त्यांना माननीय तहसीलदार साहेब जागा उपलब्ध करून देईल.
तलाठी ग्रामसेवक समितीच्या अहवालावर मजुरी
औरंगाबाद मुख्यकार्यकरी अधिकारी यांनी खुलताबाद प्रशासनाला तालुक्यातील निवड झालेल्या प्रत्येक गावात तलाठी,ग्रामसेवक यांची समिती तयार करून प्रपत्र ड यादीची प्रत्यक्षात परिस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आज दुपारी बारा वाजता घरकुल ड यादी येथे दिसणार आहेत.