September 23, 2024

औरंगाबाद पर्यटन नगरीत ‘टुरिस्ट गाईड’ होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज!

0
Contact News Publisher

स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील तब्बल औरंगाबादसह १४ प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शन (टुरिस्ट गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद: निसर्गाचे सौंदर्य पहायचे तर आमच्या गावी ये, या किल्ल्याची खासीयत सांगायला गेलो ना दिवस पुरणार नाही!  अशा शब्दांत आपणही आपल्या गावचे किल्ले, डोंगर, दऱ्या, मंदिर, एखादी ऐतिहासिक संग्रहालय किंवा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वरदान लाभलेल्या कोणत्याही स्थळांची माहिती सांगताना थकत नसाल तर याच आवडीला करिअरमध्ये रुपांतरित करण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असून या प्रशिक्षणानंतर टुरिस्ट गाईड म्हणून ओळखपत्रही दिले जाणार आहे.

पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड) प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट ( Indian Institute of Tourism and Travels Management )  ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. ज्यात मुख्यत: स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा. तसेच पर्टकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टी रुपाने कशी मांडावी या विषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ज्ञ प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील.

पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. यासाठी १८ वर्षा पुढील असणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण व वयाची अट आहे. ४० वर्षांखालील इच्छुकांसाठी किमान १२ वी उत्तीर्ण व ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या इच्छुकांसाठी किमान १० वी उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे.

स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील तब्बल औरंगाबादसह १४ प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शन (टुरिस्ट गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
फिरस्तीची आवड एका स्थिर करिअरमध्ये बदलण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षणाचा (टुरिस्ट गाईड) लाभ घ्यावा.

इच्छुकांनी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय विभागाच्या 

https://www.maharashtratourism.gov.in/certified-guide-training 

या  संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी 

www.Maharashtratourism.gov.in   या संकेतस्थळाला भेट द्यावी. अथवा ०२४०-२३४५०७५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक श्रीमंत हारकर यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending