September 22, 2024

राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय; आज नव्या गाइडलाइन्स

0
Contact News Publisher

ठाकरे सरकारचा राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय; आज नव्या गाइडलाइन्स

  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई :- महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे (Omicron Variant) सावट गडद झाले आहे. राज्यात ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल. (Thackeray government’s decision to re-impose restrictions )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी रात्री उशिरा कोविड टास्क फोर्स तसेच प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ओमिक्रॉनची सद्यस्थिती लक्षात घेत व्यापक चर्चा करण्यात आली. राज्यात नाइट कर्फ्यू लावण्याची गरज आहे का? ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अन्य कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली.

आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील. यादृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. याबाबत २४ डिसेंबर, शुक्रवारी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीत नियमावली जारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending