September 22, 2024

एस.पी.साहेब, खुलताबाद-गंगापूरमध्ये मटका,वाळू,अवैध दारू,पत्त्यांचे क्लबसह अनेक अवैध धंदे सर्रास सुरू..!

0
Contact News Publisher

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा अवैध धंदे वाल्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहेत तर आमदार प्रशांत बंब यांनी पूर्वी दिलेल्या पत्राचे अवलोकन देऊन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवला आहेत.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

गंगापूर खुलताबाद मतदारसंघात सध्या अवैध धंद्यांनी उच्छाद मांडलेला असून, यामध्ये मटका, वाळू, अवैध दारू विक्री, पत्त्यांचे क्लब, सोरट असे अवैध धंदे सरांस सुरू आहेत. या अगोदर अवैध धंद्यांवर कारवाई करणे बाबत आपणास विनंती केली होती, परंतु गंगापूर खुलताबाद मतदार संघातील कोणत्याही पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर पूर्णपणे कारवाई झालेली नाही. तसेच चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढलेले असून, चोऱ्या व दरोडे रोखण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

आपनास पुन्हा एकदा विनंती की, अवैध धंद्याबाबत माहिती घेऊन कारवाई करावी. तसेच चोऱ्या व दरोडे रोखाण्यासाठी उपाययोजना करणेबाबत कारवाई व्हावी, याबाबत माझे सहकार्य हवे असल्यास कळवावे.

खुलताबादेत घरकुल ‘ड’ यादी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; अकरा गावांचा समावेश; तुमचं नाव असेल तर..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending