September 22, 2024

पंतप्रधान मोदींनी लसीकरणाबाबत केल्या नव्या घोषणा

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

दिल्ली : कोरोना, ओमिक्रॉनची भीती बाळगू नका, सतर्क रहा; असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. १५ ते १८ वर्षे वय असलेल्या मुलांसाठी ३ जानेवारीपासून लस देण्यात येईल तर आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारीपासून बुस्टर डोस देणे सुरू होईल. ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनाही वैद्यकीय सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेता येईल, अशी घोषणा मोदींनी केली.
आज (२५ डिसेंबर) च्या रात्री जनतेला संबोधित करताना मोदी म्हणालेत की, कोरोना आणि ओमिक्रॉनच्या उपचारासाठीची आवश्यक तयारी करण्यात आली आहे. देशात १८ लाख ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. मुलांसाठीही ५ लाख बेडची व्यवस्था आहे. आपण आजपर्यंत शास्त्रीय पद्धतीने लसीकरण करण्यात आले. ख्रिसमस आणि नववर्षाचा उत्सव सतर्कता बाळगून साजरा करा, असा सल्ला मोदी यांनी दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending