September 22, 2024

नितेश राणेंनी केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, उद्या सुनावणी

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून नितेश राणे यांच्या वकिलांनी आज जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला; या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावतीने आज दुपारी तीन वाजता अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी होती. उद्या सकाळी ११ वाजता यावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

नितेश राणेंचे वकील संग्राम प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणेंवर कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही खबरदारी म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, सध्या कणकवलीत सुरू असलेल्या हालचालींवरून उद्या नितेश राणेंना अटक होण्याची वर्तवली जात आहे. कारण, आज कणकवलीत नितेश राणे यांच्या अटकेसाठी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात मिटींग झाली. बैठकीला राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे उपस्थित होते.

नितेश राणे नॉट रिचेबल
सध्या नितेश राणे हे नॉट रिचेबल आहेत, अशी चर्चा आहे. त्यांचा फोनही बंद आहे. त्यांचे पीए देखील नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राणे यांच्या अटकेच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

६ आरोपी पकडले – राजेंद्र दाभाडे
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील संतोष परब यांच्या हल्ल्यासंदर्भात ६ आरोपी पकडले असल्याची माहिती दिली. एका आरोपीला दिल्लीवरुन पकडले आहे. एकाला कालच कणकवली न्यायालयामध्ये हजर केले. त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending