पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये सुट्ट्याच सुट्ट्या; कोणत्या दिवशी येणार महत्त्वाचे सण
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी: २०२१ या वर्षाचे अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता लोकांना येत्या वर्षाचे वेध लागले आहेत. त्याचसोबत नवीन वर्षातल्या सुट्ट्या आणि त्या अनुषंगाने केलं जाणारं नियोजन याची चर्चा सुरू झाली आहे.
पुढील वर्षी अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्या या दोन ते तीन दिवस सलग किंवा जोडून आल्या आहेत. त्यामुळे दोन ते चार दिवस लांब सुट्ट्यांचं नियोजन करायचं असेल तर त्या उपयुक्त ठरणार आहेत. दोन सुट्ट्यांमधील एका कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जादा सुट्टी टाकून देखील सुट्ट्यांचं नियोजन करता येऊ शकेल.
तसंच पुढील वर्षी तीन सुट्ट्यांच्या दिवशी रविवार आल्याने त्याची वेगळी रजा मिळू शकणार नाही. यात २ ऑक्टोबर – गांधीजयंती, ९ ऑक्टोबर – ईद – ए – मिलाद आणि २५ डिसेंबर – ख्रिसमस या तीन सुट्ट्यांचा समावेश आहे.
पुढील वर्षी ज्या महिन्यात जोडून सुट्ट्या आल्या आहेत ते महिने मार्च, एप्रिल, मे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे आहेत. मार्च महिन्यात १८ मार्च रोजी धुलिवंदन आणि त्यानंतर २० मार्च रोजी रविवार आहे. जर १९ मार्च रोजी सुट्टी घेतली तर तीन दिवस सलग रजा मिळू शकेल. एप्रिल महिन्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १५ एप्रिल रोजी गुड फ्रायडे तर १७ एप्रिल रोजी रविवार आहे. या महिन्यातही १८ तारखेचा शनिवार सुट्टीसाठी वापरता येऊ शकेल.
ऑक्टोबर महिन्यातही २२ ते २४ दिवाळीची सुट्टी असून २७ तारखेला दिवाळीचा पाडवा असल्याने सुट्टी आहे. त्यात २५ तारखेला सुट्टी टाकल्यास तुम्हाला सलग रजा मिळू शकेल. दुसरीकडे मे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात दुसऱ्या शनिवारला लागून सुट्ट्या असल्याने वेगळी सुट्टी घ्यावी लागणार नाही.