September 23, 2024

कुत्र्यासाठी आदित्य ठाकरेंनी औरंगाबाद पोलिसांना लावले कामाला

0
Contact News Publisher

कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेले
आदीत्य ठाकरे यांनी घेतली दखल : दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अनिस देशमुख

औरंगबाद: दुचाकीस्वार दोघे जण कुत्र्याला दोरीने बांधून रस्त्याने फरफटत नेत असल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि़६)व्हायरल झाल्यानंतर या घटनेची राज्याचे पर्यावरन मंत्री आदीत्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेत औरंगाबाद पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले़ आदित्या ठाकरे यांचे आदेश येताच दोघांविरूध्द क्रांतीचौक पोलीस ठण्यात गुन्हा दाखल केला असून दुचाकीनंबर वरुन दोघांचा पोलीस शोध घेत आहे़
शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजबनगरातील तिरूपती वाशिंग जवळ दुचाकी (एमएच-२०-९४३६) स्वार एका दोरीने एका पांढºया रंगाच्या कुत्र्याला बांधुन ओढत असल्याचा व्हिडीओ फेससबुकवर आणि ट्वीटरवर व्हॉयरल झाला होता. व्हायरल करणाºया व्याक्तीने तो आदित्या ठाकरे यांच्या फेसबुक आणि ट्वीटरवर हॅश टॅग केल्याने पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी व्हिडीओची गंभीर दखल घेत संबधीत प्रशासाला टवाळखोराविरूध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावरून आज पीपल फॉर निमल या स्वयंसेवी संघटनेचे पुष्कर भास्कर शिंदे यांनी आज सकाळी संबधीत दुचाकीस्वार विरूध्द क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक निर्मला परदेसी यांनी दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending