September 21, 2024

… तर होऊ शकते शिवसेना – भाजपाची युती, मंत्री अब्दुल सत्तार यांचा दाव्याने खळबळ

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. कारण, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणालेत की, गडकरी यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासमोर प्रस्ताव ठेवल्यास शिवसेना आणि भाजपा (BJP) सोबत येतील.

चावी गडकरींकडे
नितीन गडकरी यांनी राज्यात लक्ष घातले तर हे होऊ शकते. शिवसेना-भाजपा यांना सोबत आणण्याची चावी गडकरी यांच्याकडे आहे. पक्षाचे नेतृत्व रश्मी ठाकरे यांच्याकडे दिले तरी कोणाची हरकत नसेल, असेही सत्तार म्हणालेत.
या दाव्याचा आधार सांगताना ते म्हणालेत की, उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला तर शिवसेना- भाजपा सोबत येतील. गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपाची मने जुळतील!

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending