September 22, 2024

पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; जाणून घ्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

नवी दिल्ली : पुढील दोन महिन्यांत देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यातच कोरोना आणि ओमिक्रॉन या नव्या प्रकाराने आता डोके वर काढले असून, देशात तिसरी लाट आली आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. आयोगाने आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजवला आहे.
देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच निवडणुकांची रणधुमाळी सुरूअसल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे आयोगाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला होता. यामुळे आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज पत्रकार परिषदेत पदत्राया, रॅली, रोड शो, सायकल आणि बाईक रॅलींवर 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यात आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत तर, पंजाब, उत्तराखंड, गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होईल.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

1 राज्य – उत्‍तर प्रदेश
14 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – 7 टप्प्याl
कधी कधी मतदान? – 10 फेब्रुवारी , 14फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
2 राज्य – पंजाब

8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च

3 राज्य – उत्‍तराखंड

8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
4 राज्य – गोवा

8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
5 राज्य – मणिपूर
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – दोन टप्प्यात
कधी मतदान? – 27 फेब्रुवारी, 3 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending